काँग्रेसची नाशिकला सोमवारी संघनात्मक आढावा बैठक | पुढारी

काँग्रेसची नाशिकला सोमवारी संघनात्मक आढावा बैठक

धुळे : पुढारी वृत्तसेवा, काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी महाराष्ट्र काँग्रेसतर्फे विभागनिहाय बैठका घेतल्या जात आहे. त्याअनुषंगाने दि.9 ऑक्टोंबर रोजी नाशिक येथे या बैठकीला धुळे शहर व जिल्हयातील पदाधिकार्‍यांनी उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे धुळे जिल्हा निरीक्षक राजाराम पानगव्हाणे यांनी काँग्रेस भवन येथे झालेल्या बैठकित केले.

धुळे येथील काँग्रेस भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर व जिल्हा काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या आढावा बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धुळे जिल्हयातील काँग्रेस पदाधिकार्‍यांकडून आपापल्या तालुक्यातील काँगे्रस पक्षाच्या कामाकाजाबाबत आढावा घेण्यात आला. बैठकित बुथनिहाय कमिटी, गटप्रमुख यादी, तसेच काँग्रेस पक्षातर्फे जिल्हयात घेतलेले विविध कार्यक्रम, जनसंवाद यात्रेचा आढावा याची माहिती देण्यात आली.

याप्रसंगी काँग्रेसचे धुळे जिल्हा निरीक्षक राजाराम पानगव्हाणे यांनी बोलतांना सांगितले कि, धुळे लोकसभा मतदासंघाची मजबुत बांधणीसाठी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी एकदिलाने काम केले पाहिजे,येणार्‍या निवडणूकीत काँग्रेसचाच खासदार निवडून येणार असल्याने कार्यकर्त्यांनी गाफील न राहता जनतेमध्ये गेले पाहिजे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,विधीमंडळ पक्षनेता आ.बाळासाहेब थोरात,प्रदेश कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील,कार्याध्यक्ष कु.प्रणिती शिंदे, माजी मंत्री के.सी.पाडवी, राजु वाघमारे यांच्या उपस्थितीत दि.9 ऑक्टोंबर रोजी नाशिक येथे काँग्रेस पक्षाची विभागाची जिल्हानिहाय आढावा बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन पानगव्हाणे यांनी केले.यावेळी धुळे शहर काँग्रेस निरीक्षक हेमंत ओगले,जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर,शहराध्यक्ष डॉ.अनिल भामरे,काँगे्रस तालुकाध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे, माजी पं.स.सदस्य पढरीनाथ पाटील,शिरपुर तालुकाध्यक्ष मनोहर पाटील,साक्री तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे आदींनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा आढावा बैठकीला काँग्रेसचे बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, काँगे्रसचे धुळे तालुका अध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, शिरपूर तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, आसिफ खान, मोहन पाटील, पंढरीनाथ पाटील, बाजार समितीचे संचालक एन.डी. पाटील, साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, जि.प.सदस्य, प्रवीण चौरे,जि.प.सदस्य अरुण पाटील,आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button