नायडोंगरी (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा, येथे दारू पिऊन पत्नीस व मुलास मारझाेड करणाऱ्या पतीस माय-लेकाने डाेळ्यात मिरची पूड टाकून नायलाॅन दाेरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली असून, संशयित पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर मुलगा अल्पवयीन असल्याने बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. (Nashik Murder)
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृंदावननगर येथे राहणारे संजय गणेश गायकवाड हे दारूच्या नशेत पत्नी उषा गायकवाड व मुलास दरराेज मारझाेड करत. या घटनेला वैतागून पत्नी उषा व अल्पवयीन मुलगा याने गुरुवारी (दि. ५) रात्री संजय यांच्या डाेळ्यात मिरची पूड टाकून नायलाॅन दाेरीने गळा आवळत खून केला असल्याची फिर्याद संजय यांची आईने दिली. खून केल्यानंतर माय-लेक दाेघेही फरार झाले हाेते. पाेलिसांनी तपासचक्रे फिरवत काही तासांतच दाेघांनाही गजाआड केले असून, उषा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर मुलगा हा अल्पवयीन असल्याने बालसुधारगृहात पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे हे करीत आहेत. (Nashik Murder)
हेही वाचा :