Nashik Civil Hospital : जिल्हा रुग्णालयातील औषध साठ्यावरून विसंगती

जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news
जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांचा औषधांच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. त्यातच नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील औषध साठ्यावरून पालकमंत्री आणि जिल्हा रुग्णालयाच्या दाव्यांवरून विसंगती समोर आली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी केलेल्या दाव्यानुसार रुग्णालयात महिनाभर पुरेल इतका औषधसाठा शिल्लक आहे. तर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आरोग्य उपसंचालकांना बुधवारी (दि.४) लिहलेल्या पत्रानुसार रुग्णालयात १५ दिवस पुरेल इतका औषधसाठा शिल्लक असल्याचे लिहले आहे. (Nashik Civil Hospital)

 संबधित बातम्या :

जिल्हा शासकीय रुग्णालयात दादा भुसे यांनी गुरुवारी (दि.५) पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध कक्षांना भेटी देत पाहणी केली. तसेच रुग्ण व नातलगांसोबत संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या आवारातील व गच्चीवरील अस्वच्छतेबाबत भुसे यांनी असमाधान व्यक्त केले. दरम्यान, पत्रकारांशी बोलतांना भुसे यांनी सांगितले, रुग्णालयाची पाहणी करून स्वच्छतेबाबत सुचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयात महिनाभर पुरेल इतका औषध साठा शिल्लक आहे. नाशिक जिल्ह्यातील सरकारी रुग्णालये आणि महापालिका रुग्णालयांमधील स्थितीचा आढावा घेत आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा शिल्लक आहे. तसेच औषधांसाठी निधीचीही टंचाई नसल्याचे त्यांनी सांगीतले. मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली असून कुठेही अडचण होणार नसल्याचा दावा भुसेंनी केला आहे. दरम्यान, भुसे यांनी केलेल्या औषधसाठ्याचा दाव्यात आणि जिल्हा रुग्णालयाच्या पत्रात विसंगती आढळून आली आहे. त्यामुळे नेमका कोणाचा दावा खरा याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. (Nashik Civil Hospital)

पाहणीत आढळली अस्वच्छता

– अस्वच्छता झाकण्यासाठी मोठ्या कुंड्यांचा वापर केल्याचे पाहणीत उघड

– पायऱ्या व कक्षांबाहेरील परिसरातील अस्वच्छता

– रुग्णालयीन इमारतीच्या गच्चीवर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता

– इमारतीच्या भिंतींना पाण्यामुळे ओल आली.

– इमारतीतील विद्युत तारांची नादुरुस्ती, नादुरुस्त लिफ्ट

… तर जनप्रक्षोभ होईल

राज्य शासनाने १५ ऑगस्टपासून सर्व आरोग्य सेवा मोफत केल्याने रुग्णालयांमधील बाह्य व आंतररुग्र संख्येत वाढ झाल्याचा दावा आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे केलेल्या पत्रव्यवहारात जिल्हा रुग्णालयाने केला आहे. त्यामुळे औषध मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण जाली आहे. तसेच वरिष्ठ स्तरावरून औषधसाठा पुरवठा झालेला नसल्याने १५ दिवस पुरेल इतकाच औषधसाठा उपलब्ध आहे. औषधे उपलब्ध न झाल्यास जनप्रक्षोभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

आठवडाभरात समस्यांबाबत बैठक घेणार

पाहणी दौऱ्यात रुग्णालयातील लिफ्ट बंद आढळली आहे. रुग्णालयातील औषध साठ्याचा तुडवडा भासणार नाही यासाठी प्रयत्नशील असून लवकरच शासन दरबारी पाठपुरावा करून औषध साठा उपलब्ध होईल. रुग्णांची गैरसोय व्हायला नको व प्रत्येकास दर्जेदार उपचार मिळायला हवेत यासाठी शासन कटिबध्द आहे. जिल्हा रुग्णालयातील समस्या सोडवण्यासाठी आठवडाभरात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल. – दादा भुसे, पालकमंत्री.

पालकमंत्र्यांच्या ताफ्यामुळे रुग्णवाहिका खोळंबल्या

पालकमंत्री दादा भुसे हे गुरुवारी (दि.५) दुपारी जिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आले असताना मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहने रुग्णालयाच्या आवारातच उभी केल्याने रुग्णवाहिकांना ये-जा करण्यास अडथळे निर्माण झाले. त्यामुळे रुग्ण व नातलगांना स्वत:हून रुग्णालयात उपचारासाठी पायी जावे लागल्याची धक्कादायक बाब समोर आली.

जिल्हा रुग्णालयात भुसे यांनी पाहणीसाठी भेट दिली. त्यावेळी शासकीय वाहने व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच गर्दी झाली होती. त्यामुळे आवारात बाहेरून येणाऱ्या चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांना आवारात वळण घेण्यास जागा नसल्याने त्या प्रवेशद्वाराजवळच खोळंबल्या. अखेर रुग्णवाहिकेतील रुग्णांच्या नातलगांनी रुग्णांना कडेवर घेऊन, सलाइनची बाटली पकडून पायीच रुग्णालयात नेले. त्यामुळे वाहनांच्या ताफ्यात रुग्णांना तारेवरची कसरत करून रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागल्याचे वास्तव समोर आले आहे.

————-

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news