Nashik Lasalgaon News : लासलगावी उभारणार शिवरायांचा अश्वारूढ पुतळा

प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
Published on
Updated on

लासलगाव (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा, अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य अश्वारूढ पुतळा लासलगाव ग्रामपंचायतीच्या प्रांगणात उभारला जाणार असून, तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आल्याची माहिती लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांनी दिली. (Nashik Lasalgaon News)

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या लासलगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असावा, अशी मागणी लासलगावकरांतर्फे वेळोवेळी केली गेली आहे. लासलगाव ग्रामपंचायतीच्या प्रांगणात पुरेशी जागा असल्याने या जागेत भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे नुकताच पाठविण्यात आला आहे. प्रस्तावित जागेवर भव्य चौथरा उभारला जाणार असून, शिवकालीन आठवणींना उजाळा मिळणारे देखावे सादर केले जाणार आहेत. परिसराचे सुशोभीकरण केले जाणार असून, आकर्षक विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्याचा मानस ग्रामपंचायतीचा आहे. शासनाकडून याबाबत परवानगी मिळताच तातडीने या ठिकाणी काम सुरू केले जाणार असल्याची माहिती होळकर यांनी दिली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news