छत्रपती संभाजीनगर : पैठण गेट भागात वृद्धेची हातपाय बांधून हत्या | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : पैठण गेट भागात वृद्धेची हातपाय बांधून हत्या

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पैठण गेट रस्त्यावरील सन्मित्र कॉलनीत बुधवारी (दि. ४) रात्री वृद्ध महिलेची हातपाय आणि तोंडाला चिकट पट्टी बांधून हत्या करण्यात आली. ही घटना रात्री सव्वा अकरा वाजता उघडकीस आली. अलका तळणीकर (वय ७०) असे वृद्धेचे नाव आहे. त्यांच्या हत्येमागील हेतू स्पष्ट झालेला नाही. घरात त्या एकट्याच राहत होत्या अशी माहिती क्रांतीचौक पोलिसांनी दिली आहे.

महिलेला मेसचे जेवण दिले जायचे. त्यांचा मुलगा अजिंक्य हा पुण्याला राहतो. त्याने अलका यांच्या मोबाईलवर फोन केला होता. त्या फोन घेत नाही म्हणून मुलाने मेस मधील मालकांना फोन केला. त्यानंतर मेस मधील अशोक नावाच्या मुलाने वरच्या मजल्यावर जाऊन पाहिल्यावर घटना उघडकीस आली. त्यानंतर त्याने घटनेची माहिती क्रांतीचौक पोलिसांना दिली. यानंतर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी दाखल झाले.

Back to top button