नाशिक : प्रेस कामगारांची दिवाळी होणार 'गोड', यंदा सोळा हजार बोनस

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा, नाशिकरोड येथील आयएसपी, सीएनपी प्रेस कामगारांना यंदा १६ हजाराचा दिवाळी बोनस मिळणार आहे. प्रेस कामगारांना आतापर्यंतचा हा सर्वात जास्त बोनस आहे. बोनस जाहीर होताच कामगारांनी आनंदोत्सव साजरा केला.
संबधित बातम्या :
- Nashik News : घरकुलासाठी नांदगावला प्रहारचे झोपडी आंदोलन
- Pune Yerwada jail : येरवडा कारागृहात पुन्हा कैद्यावर हल्ला; पत्र्याच्या तुकड्याने वार
सन २०१२ पर्यंत प्रेस कामगारांना २,४६७ रुपये बोनस मिळत होता. २०१२ नंतर सत्ता परिवर्तन झाले. प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी प्रशासनाशी यशस्वी चर्चा केल्याने बोनस रकमेत दहा हजारापर्यंत वाढ झाली. हे नेते यंदाही बोनसवाढीसाठी प्रयत्नशील होते. होशंगाबाद, पंचमढी (मध्यप्रदेश) येथे देशभरातील प्रेस कामगार नेते व प्रेस व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींची बैठक झाली. नाशिक रोड प्रेस मजदूर संघाच्या नेत्यांनी बोनसमध्ये वाढ करण्याची मागणी केली. त्यानंतर या प्रश्नी सप्टेंबरमध्ये नवी दिल्लीत प्रेस व्यवस्थापनासमवेत विशेष बैठक झाली. त्यात या वर्षीच्या बोनसमध्ये वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. प्रेस महामंडळाचे संयुक्त महाव्यवस्थापक (मनुष्यबळ विकास) प्रकाशकुमार यांनी १६ हजाराचा बोनस देण्याचे परिपत्रक काढले. ते नाशिकरोड प्रेस मजदूर संघाला प्राप्त झाले.
नाशिकरोड प्रेससह देशभरातील सर्व प्रेस कामगारांच्या खात्यात लवकरच बोनसची रक्कम जमा होईल, अशी माहिती जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली. मजदूर संघाचे उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, राजाभाऊ जगताप, संतोष कटाळे, अविनाश देवरुखकर, इरफान शेख, अशोक जाधव, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, योगेश कुलवधे, बाळासाहेब ढेरिंगे, अशोक पेखळे, बबन सैद, राहुल रामराजे, अण्णा सोनवणे आदी उपस्थित होते.
हेही वाचा :