Nashik Crime : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांना कोट्यवधी रुपयांचा गंडा

Nashik Crime : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांना कोट्यवधी रुपयांचा गंडा

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये भामट्यांनी दोघांना सुमारे एक कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात जमीन व्यवहारात ९० लाख रुपयांचा तर ऑनलाइन धान्य खरेदी विक्रीत एका व्यापाऱ्यास ९ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी गंगापूर व सायबर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.( Nashik Crime)

जेम्स प्रसाद वरसाला (३६, रा. आनंद नगर, नाशिकराेड) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित पद्माकर घुमरे व सुनीता घुमरे उर्फ सुनीता भंडारे यांच्याविरोधात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे. जेम्स यांच्या फिर्यादीनुसार, दोघांनी २ मे ते ३० सप्टेंबर २०१४ या कालावधीत गंगापूर रोडवरील कार्यालयात गंडा घातला. वाडिवऱ्हे जवळ अकरा एकर जमीन खरेदी करून देतो असे सांगून दोघांनी जेम्स यांच्याकडून वेळोवेळी ९० लाख रुपये घेतले. मात्र जमीन व्यवहार करून दिला नाही. तसेच घेतलेले पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे जेम्स यांनी गंगापूर पोलिसांकडे दोघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. तर दुसऱ्या घटनेत पश्चिम बंगाल येथील व्यापाऱ्याने नाशिकच्या व्यापाऱ्यास ८ लाख ५२ हजार १०० रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. नारायण बापू चांदवडकर (२८, रा. श्रद्धा विहार कॉलनी, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित सुरजकुमार चौधरी (रा. पश्चिम बंगाल) याने २० ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान गंडा घातला. चांदवडकर यांचा धान्य खरेदी विक्रीचा व्यवसाय असून त्यांनी संशयितासोबत व्यवहार केला. चांदवडकर यांनी ऑनलाइन पद्धतीने संशयितासोबत व्यवहार करीत तांदुळ मागवले. त्यासाठी पैसे दिले मात्र संशयिताने तांदुळ दिले नाही. चांदवडकर यांच्याकडून घेतलेले पैसे परत केले नाहीत. त्यामुळे इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news