Nashik Onion News : विंचूर, निफाड बाजार समितीत कांदा लिलाव सुरू; लासलगावचं काय?

Nashik Onion News : विंचूर, निफाड बाजार समितीत कांदा लिलाव सुरू; लासलगावचं काय?

लासलगाव (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार विंचूर पाठोपाठ आता उपबाजार निफाड येथे आजपासून कांद्याचे लिलाव सुरु झाले असून गेल्या बारा दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या बंदमुळे हैराण झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. तरी येत्या गुरुवारी लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू होणार आहे.  (Nashik Onion News)

संबधित बातम्या :

नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंद असताना लासलगावच्या विंचूर उप बाजार समितीत कांदा लिलाव सुरु असून त्या पाठोपाठ आता निफाड येथे कांदा लिलाव सुरु झाले असून निफाड येथे 450 वाहनातून 7 हजार क्विंटल कांद्याची आवक आली त्याला जास्तीजास्त 2300 रुपये, कमीतकमी 1000 रुपये तर सर्वसाधारण 2000 रुपये इतका बाजार भाव मिळाला तर विंचूर येथे 1450  वाहनातून 21 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली जास्तीजास्त 2430 रुपये, कमीतकमी 1000 रुपये तर सर्वसाधारण 2100 रुपये इतका बाजार भाव मिळाला. तर  येत्या गुरुवार पासून देखील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील मुख्य आवारात कांदा लिलाव सुरू होणार असल्याची माहिती संचालक पंढरीनाथ थोरे यांनी दिली आहे. (Nashik Onion News)

नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपल्या विविध मागण्याकरता कांद्याला लिलाव बंद ठेवले आहे. मात्र यामुळे  कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असताना शेतकरी हिताकरीता विंचूर बाजार समितीने कांदा लिलाव सुरू ठेवले असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असेल तरी देखील कांद्याला 2000 ते 2100 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी या मिळणाऱ्या भावात समाधानी नसून जर सर्व बाजार समिती सुरू असल्यास स्पर्धा होऊन 3000 हजार भाव मिळाला असता तरी सरकारने दखल घेऊन त्वरित बाजार समिती चालू करावा व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव द्यावा अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news