Trimbakeshwar temple : सलग सुट्यांमुळे त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी | पुढारी

Trimbakeshwar temple : सलग सुट्यांमुळे त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा, गुरुवारी गणेशविसर्जन झाले, शुक्रवारी ईदची सुटी जाहीर झाली. त्यानंतर सोमवार (दि.2)पर्यंत सलग शासकीय सुटी मिळाल्याने त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar temple) येथे भाविक पर्यटकांचा ओघ वाढला आहे. शहरात प्रचंड गर्दी झाली आहे.

शुक्रवारपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. पितृपंधरवड्यात येथे नारायण नागबळीसाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. खासगी वाहनांनी आलेल्या भाविकांची संख्या अधिक आहे. भाविकांच्या वाहनांना शहरात उभे करण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. भाविक पर्यटकांनी स्वामी समर्थ गुरुपीठमार्गे रिंगरोडलगत एका बाजूने वाहने उभी केल्याने या रस्त्यावर दिवसभर वाहतूक कोंडी अनुभवास येत होती. वाहतुकीचे आणि वाहन पार्किंगचे नियोजन पूर्ण कोलमडल्याने भाविकांना व नागरिकांना पायी चालणेही मुश्कील झाले होते.

त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांगा

त्र्यंबकेश्वर मंदिरात पूर्व दरवाजाला दर्शनासाठी लागलेली रांग शनिवार व रविवार रात्री आठनंतरही दर्शनबारी मंडपाबाहेर होती. दोनशे रुपये तिकीट दर्शनासाठी तिकीट घेऊन थेट दर्शनासाठी सोडण्यात येत असल्याने तिकिटाचा काळाबाजार थांबला आहे. मात्र, दुपारनंतर तिकीट विक्री थांबवून देणगी दर्शन बंद ठेवण्यात येत आहे. दर्शनाची ही बारी मंडप ओलांडून थेट ग्रामीण भारतीय स्टेट बँकेपर्यंत गेली होती. सकाळी मंदिर उघडेपर्यंत रांगेत हजारो भाविक दाखल झाले होते. तिकीट विक्री थांबवल्याने काही तास रांगेत उभे राहिलेले भाविक दर्शन मिळणार नसल्याने आक्रमक झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा :

Back to top button