नाशिक : मिरवणुकांमुळे शुक्रवारी वाहतूक मार्गात मोठे बदल | पुढारी

नाशिक : मिरवणुकांमुळे शुक्रवारी वाहतूक मार्गात मोठे बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात ईद-ए-मिलादनिमित्त शुक्रवारी (दि. २९) जुने नाशिक आणि नाशिकरोड येथे जुलूस मिरवणूक काढली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक विभागाने वाहतूक मार्गात बदल केले आहेत. त्यासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अधिसूचना काढली आहे.

संबधित बातम्या :

जुने नाशिकमधील जुलूस मिरवणुकीस दुपारी २ वाजता चौक मंडईतून सुरुवात होईल. कथडा मशीद, शिवाजी चौक, आझाद चौक, चव्हाटा, काझीपुरा चौकी, कोकणीपुरा, त्र्यंबक पोलिस चौकी, दूध बाजार, बडी दर्गा या मार्गे मिरवणूक निघणार असून, मिरवणुकीत शेकडो नागरिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मिरवणूक मार्गासह इतर काही मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद केला असून, पर्यायी मार्ग दिला आहे.

या मार्गावर प्रवेशबंदी

सारडा सर्कल ते हाजी टी पॉइंट रस्ता, शिवाजी चौक- मीरा दातार दर्गा रस्ता, शिरसाठ हॉटेल – आझाद चौक रस्ता, शिवाजी चौक – मीरा दातार दर्गा या रस्त्यांवर वाहतुकीला प्रवेशबंदी

पर्यायी मार्ग

सारडा सर्कल ते वडाळा नाका, डावीकडून मोठा राजवाडामार्गे, खडकाळी सिग्नल ते अब्दुल हमीद चौकाकडे जाणारी वाहतूक सारडा सर्कल ते वडाळा नाकाकडून राजवाडामार्गे जाईल. शिवाजी चौक – मीरा दातार दर्गाकडे जाणारी वाहतूक शीतळादेवी मार्गे कुंभारवाडा मार्गे वळवली आहे.

नाशिकरोडचा जुलूस मार्ग

मोहम्मदिया चौकातून सकाळी ९ वाजता जुलूसला प्रारंभ होईल. देवळाली गाव – गोसावीवाडी – सुभाषरोड, नाशिकरोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – बिटको पॉइंट – विहितगाव मार्गे परत देवळाली गाव – गाडेकर मळा – मनपा जॉगिंग ट्रॅक येथे मिरवणुकीचा समारोप होईल.

या मार्गावर प्रवेश बंद

रेल्वेस्थानकाकडून रिपोटे कॉर्नर – सुभाष रोड – डॉ. आंबेडकर पुतळा – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – बिटको चौक, बिटको चौक ते मुक्तिधाम मार्ग – सत्कार पॉइंट – देवळाली गाव – विहितगाव सिग्नल दुतर्फा वाहतूक बंंद करण्यात येणार आहे.

पर्यायी वाहतूक

बिटको चौक – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – देवी चौक – रेल्वेस्थानक पोलिस चौकी – सुभाष रोड – रिपोटे कॉर्नर – मालधक्का रोडने विहितगावकडून देवळाली कॅम्पकडे मार्गस्थ होणार आहे. देवळाली कॅम्प – विहितगाव सिग्नल – मथुरा चौक – रोकडोबा वाडी – खोले मळा – जय भवानी रोड – आर्टिलरी सेंटर रोडने मार्गस्थ होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button