

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कळवण तालुक्यातील नाकोडा, पाटविहीर, बेजसह परिसरात शेती पंप, शाळेची रद्दी, जुणे लोखंड चोरणाऱ्या पाच जणांना कळवण पोलिसांनी अटक केली आहे.
यामध्ये जुनीबेज येथील तुषार बापु पवार (वय 20), राकेश किशोर पवार (वय 22), अक्षय कांतीलाल पवार (वय 21) यांच्याकडून टेक्समो कंपनीची चार एचपीची ईलेक्ट्रीक मोटर, तर विवेक अनिल साहणे (वय 21), रविंद्र नामदेव पवार (वय 19) यांच्याकडून शाळेचे जुने पेपर व जुन्या पुस्तकाची रद्दी, जुणे लोखंड, पत्र्याचे तुकडे, चारा कापण्याचा लोखंडी अडकीत्ता सात लोखंडी ॲगल असा एकूण १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक खगेंद्र टेभेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे, पोलीस विठ्ठल बागुल, पंकज शेवाळे, संदिप बागुल, संदिप गांगुर्डे, नितीन वाघमारे, कृष्णा गवळी, अनिल बहिरम यांनी ही कामगिरी केली.
हेही वाचा :