Nashik Crime : नाशिकमध्ये ऐन गणेशोत्सवात वाहनांची तोडफोड | पुढारी

Nashik Crime : नाशिकमध्ये ऐन गणेशोत्सवात वाहनांची तोडफोड

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील देवळाली गाव, विहितगाव, वडनेर दुमाला या भागांत रविवारी (दि. २४) मध्यरात्रीच्या सुमारास सात वाहनांच्या काचांची तोडफोड करण्याची घटना घडली. वारंवार घडणाऱ्या वाहनांच्या जाळपोळ अन् तोडफोडीच्या प्रकारांमुळे परिसरात दहशत निर्माण झालेली आहे. दरम्यान, या प्रकरणी उपनगर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामधील एक अल्पवयीन मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Nashik Crime)

संबधित बातम्या :

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास देवळाली गावातील महात्मा गांधी पुतळ्याजवळील किशोर सिसादे फेटेवाले यांचे चारचाकी वाहन (एमएम १५ सीएम ५६२६), विशाल लक्ष्मण बोरसे यांची (एमएच ०४ सीझेड १०), राजेंद्र शिवराम बोराडे यांची (एमएच १५ एचजी १६१२), संजय पोरजे यांचे (एमएच ०४ एफझेड ६७६२), (एमएच ०३ झेड १९६९) या वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले. उपनगर पोलिसांनी या प्रकरणात नागेश राधेशाम राऊत (२३, रा. वडनेर रोड, विहितगाव) तसेच एका 17वर्षीय अल्पवयीन बालकास ताब्यात घेतले. (Nashik Crime)

दरम्यान नाशिकरोड व उपनगर पोलिस ठाण्याचा हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वाहनांची जाळपोळ अन् तोडफोडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांनी कायदा सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या अशा घटनांची दखल घेत घटनास्थळांची पाहणीदेखील केली होती. पोलिसांना कठारे कारवाई करण्याचे निर्देशदेखील दिले होते. याप्रश्नी कठोर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा :

Back to top button