Nashik Crime : कागदपत्रांचे बनावटीकरण करुन फसवणूक करणारा गजाआड | पुढारी

Nashik Crime : कागदपत्रांचे बनावटीकरण करुन फसवणूक करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कागदपत्रांचे बनावटीकरण करून फसवणूक करणाऱ्या संशयितास खंडणी विरोधी पतकाने ताब्यात घेतले आहे. मुक्ताजी सखाराम गुंजाळ (६२, रा. मुंबईनाका) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. गुंजाळ विरोधात २०१९ मध्ये सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. (Nashik Crime)

मात्र गुंजाळ फरार होते. त्यामुळे त्यांचा शोध सुरु असतानाच पथकाने सापळा रचून मुंबईनाका परिसरातून गुंजाळला ताब्यात घेत सरकारवाडा पोलिसांच्या स्वाधिन केले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सहायक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, उपनिरीक्षक दिलीप भोई, सहायक उपनिरीक्षक दिलीप सगळे, हवालदार किशोर रोकड, राजेश भदाणे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा :

Back to top button