नाशिक : झाडाची फांदी तोडताना तोल जाऊन एकाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : झाडाची फांदी तोडताना तोल जाऊन एकाचा मृत्यू

नाशिक : वृक्षाची फांदी ताेडताना एकाचा मृत्यू झाल्याची घटना विल्होळी येथे घडली. भास्कर रायाजी मोरे (४९, रा. विल्होळी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भास्कर मोरे हे रविवारी (दि.१७) दुपारी अडीच वाजता फांदी तोडत असताना तोल गेल्याने ते खाली पडले. त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान, त्यांचा सायंकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button