Nashik Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल | पुढारी

Nashik Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येत्या मंगळवारपासून (दि.१९) सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. त्यासाठी नागरिकांसह सार्वजनिक गणेश मंडळांनी जय्यत तयारी सुरु केली असून देखावे उभारणीची अंतिम तयारी सुरु आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातही आरास, देखावे पहाण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेत शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक मार्गात बदल व काही मार्ग बंद केले आहेत. (Nashik Ganeshotsav 2023)

शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी शहरातील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. त्यानुसार १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान, सायंकाळी सहा ते रात्री १२ वाजेदरम्यान वाहतूक मार्गात बदल किंवा वाहतूकीस प्रवेश बंद राहणार आहेत. त्यासाठी शहरातील विविध मार्ग निश्चित केले आहेत. तसेच पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.

संबधित बातम्या :

वाहतूकीस प्रवेश बंद मार्ग

– सारडा सर्कल-खडकाळी सिग्नल- शालिमारमार्गे सीबीएसकडे जाणारा मार्ग

– खडकाळी सिग्नलकडून दिपसन्स कॉर्नर- नेहरु उद्यानकडून गाडगे महाराज पुताळामार्गे मेनरोड व बादशाही कॉर्नरकडे जाणारा मार्ग

– त्र्यंबक पोलिस चौकी ते बादशाही कॉर्नर दुतर्फा मार्ग

– गाडगे महाराज पुतळा-धुमाळ पॉइंट- मंगेश मिठाई कॉर्नर

– सीबीएसहून शालिमार व नेहरु उद्यानाकडे जाणारा मार्ग

– मेहेर सिग्नलकडून सांगली बँक सिग्नल- धुमाळ पॉइंट – दहीपूल दुतर्फा मार्ग

– प्रतिक लॉजकडून नेपाळी कॉर्नरकडे जाणारा मार्ग

– अशोक स्तंभ – रविवार कारंजा – मालेगाव स्टँड दुतर्फा मार्ग

– मालेगाव स्टँड – रविवार कारंजा – शालिमार दुतर्फा मार्ग

– मोडक सिग्नल – खडकाळी सिग्नल मार्गे कालिदास कलामंदिर मार्गे शालिमारकहे जाणारी दुतर्फा वाहतूक बंद राहिल.

पर्यायी वाहतूक मार्ग

– सारडा सर्कल – गडकरी सिग्नल – मोडक सिग्नल – सीबीएस – मेहेर सिग्नल – अशोक स्तंभ – रामवाडी मार्गे – मालेगाव स्टँड – मखमलाबाद नाका – पेठनाका – दिंडोरी नाका मार्गे इतरत्र जातील.

– मालेगाव स्टँडपर्यंत येणारी वाहतूक मखमलाबाद नाका – रामवाडी – जुना गंगापूर नाका मार्गे इतरत्र जातील.

वाहतूक मार्गात बदल व पर्यायी मार्ग

– मोडक सिग्नल व खडकाळी सिग्नल येथून किटकॅट चौफुलीकडे येणारी व कालीदास कलामंदीरमार्गे सुमंगल कपडयाचे दुकान या मार्गावरील दुतर्फा वाहतूक सारडा सर्कल, गडकरी सिग्नल, मोडक सिग्नलकडून सीबीएस सिग्नलमार्गे जाऊ शकेल.

– सीबीएस बाजुकडुन गायकवाडक्लास, कान्हेरवाडी मार्गे किटकॅट, सुमंगल कपडयाचे दुकानाकडे व सुमंगल कापडया कडुन कालीदास मार्ग व किटकॅटकडुन सिबीएस बाजुकडे ये-जा करणारी वाहतुकीस दोन्ही बाजुने सर्व वाहनांसाठी “प्रवेश बंद” राहील.

– पंचवटी विभागातील सरदारचौक ते श्री काळाराम मंदीर असा मार्ग दुतर्फा वाहतूकीस बंद राहणार आहेे.

– पंचवटीतील मालविय चौक ते गजानन चौक, नागचौक, शिवाजीचौक व शिवाजीचौक ते मालवियचौक असा दुतर्फा मार्ग वाहतूकीसाठी बंद आहे.

विसर्जनानिमित्त वाहतूक मार्गात बदल

गणेशोत्सवात काही मंडळांतर्फे व नागरिकांकडून पाचव्या व सातव्या दिवशी गणरायाचे विसर्जन केले जाते. त्यावेळी विसर्जन स्थळांवर गर्दी होत असल्याने तेथेही वाहतूक मार्गात बदल केले आहेत. त्यानुसार निमाणी बसस्थानकावरून पंचवटी कांरजा मालेगाव स्टॅन्ड रविवार कांरजा मार्गावर आणि सीबीएस कडुन पंचवटीकडे जाणाऱ्या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या सर्व बसेस, सिटीलिंक बसेस व जड वाहनांना २३ व २५ सप्टेंबरला दुपारी दोन ते रात्री बारा पर्यंत वाहतुकीसाठी ‘प्रवेश बंद’ करण्यात येणार आहे. यावर पर्यायी मार्ग म्हणून काटयामारुती चौक, संतोष टी पॉईन्ट, कन्नमवारपुल, द्वारका सर्कल मार्गाने नाशिक, नाशिक रोड, अंबड, सातपुर व इतर ठिकाणी जातील. तसेच सीबीएस वरून निघणारी वाहतूक अशोकस्तंभ, रामवाडीपुल, मखमलाबाद नाका, पेठनाका सिग्नल, दिंडोरी नाका, या मार्गावरुन निमाणी स्टॅन्डकडे जातील.

Back to top button