धुळे : प्रकाशा बुराई प्रकल्पाच्या मागणीसाठी संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन

प्रकाशा बुराई
प्रकाशा बुराई

धुळे, पुढारी वृत्तसेवा : प्रकाश बुराई सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सिंचन विभागाच्या अनास्तेबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली.

तापी नदीपात्रात उद्भव असणाऱ्या प्रकाशा बुराई सिंचन योजनेचा प्रश्न प्रलंबित असल्याने संघर्ष समिती आक्रमक झाली. या समितीच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्याचे माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख, माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्यासह शेती संघाचे बी. के. पाटील, सुरेश शिंत्रे, गोकुळ नांदरे, दीपक गवते, संभाजीराव पाटील यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

गेल्या वीस वर्षांपासून या प्रकल्पाचे काम प्रलंबित आहे. 35000 हेक्टर सिंचनक क्षमता असणाऱ्या या प्रकल्पाला त्यावेळी 570 कोटी रुपये खर्च येणे अपेक्षित होते. मात्र सिंचन विभागाने चुकीचे शेरे मारून हा प्रश्न प्रलंबित ठेवला. तर लोकप्रतिनिधींकडून देखील अपेक्षित पाठपुरावा न झाल्याने शेतकऱ्यांच्या हिताचा हा प्रकल्प रखडत पडला आहे. पण आता राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून या योजनेसाठी निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्याचप्रमाणे राज्यातील सरकारच्या मदतीने केंद्र शासनाकडून या योजनेसाठी निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या हिताचा असणारा हा प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा लागेल, अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

यावेळी कार्यकारी अभियंता तुषार चीनवलकर यांना आंदोलकांनी आपल्या मागण्यांची निवेदन दिले. यावेळी चर्चा करताना चीनवलकर यांनी हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी सरकारी स्तराव स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news