पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ साक्री तालुका समाजातर्फे उद्या मंगळवार (दि.५) साक्री तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.
सकल मराठा समाजातर्फे साक्री येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात झालेल्या बैठकीप्रसंगी सर्वानुमते हा बंदचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सर्व व्यवहार बंद ठेवून मराठा समाजातर्फे शांततेत निषेध मोर्चा काढून प्रशासनास निषेधाचे निवेदन दिले जाणार आहे. श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या आवारातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उद्या सकाळी दहा वाजता हा निषेध मोर्चा साक्री शहरातून काढण्यात येणार आहे.
यानंतर प्रशासनास निषेधाचे निवेदन दिले जाणार आहे. हे संपूर्ण आंदोलन केवळ जालना घटनेच्या निषेधार्थच करण्यात येत असून ते शांततेतच होणार आहे. तरी आंदोलनात मराठा समाजाच्या सोबत सर्व समाजातील महिला, पुरुष, तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा :