नाशिक : रावळगाव खून प्रकरणात एकाला जन्मठेप

जन्मठेप
जन्मठेप

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

किरकोळ वादातून रावळगावमध्ये झालेल्या खून प्रकरणातील आरोपीला मालेगाव न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २० ऑक्टोबर २०१८ रोजी ही घटना घडली होती. गणेश ऊर्फ भट्या संजय पवार (वय २३) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

महेंद्र जिभाऊ थोरात यांनी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. त्यांचा भाऊ राजेंद्र थोरात (रा. राहुलनगर, रावळगाव) याच्या आईचा हात संजय मोतीराम पवार यांच्या मुलाने मुरगाळला होता. त्याबाबत त्याने विचारणा केली असता पवार यांच्या गटाने कत्ती, चॉपर, गुप्ती, विळा आदी प्राणघातक शस्त्रांसह हल्ला चढवत राजेंद्र जिभाऊ थोरात यांना बेदम मारहाण केली. तसेच गणेश पवार याने चाकूने राजेंद्रच्या छातीवर जोरदार वार केला. त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी तपास करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. हा खटला जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांच्या कोर्टात चालला. सरकारी पक्षातर्फे अॅड. अशोक पगारे यांनी नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यातून केवळ गणेश पवार विरोधात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा सिद्ध होऊन त्यास जन्मठेप आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सहआरोपी सबल पुराव्याअभावी निर्दोषमुक्त झाले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news