नाशिक : शरद पवार गटाची कार्यकारिणी घोषित, १२ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडाचा झेंडा उगारल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली असून, शरद पवार गटाने स्वतंत्ररीत्या शहर कार्यकारिणी तसेच जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांची घोषणा केली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली आहेत.
अजित पवार यांनी शिंदे -फडणवीस सरकारला पाठिंबा दर्शवित थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पवार यांच्यासोबतच ८ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीत सरळ सरळ फूट पडून पक्षाची दोन गटांत विभागणी झाली आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळांसह सहा आमदारांनी अजित पवारांची साथ दिल्याने बहुतांश संघटना भुजबळ आणि अजित पवार गटाकडे गेली. परंतु, नाशिक लोकसभेचे कार्याध्यक्ष कोंडाजी आव्हाड, माजी नगरसेवक गजानन शेलार आणि गोकुळ पिंगळे यांनी शरद पवारांची साथ दिली. त्यामुळे आव्हाड यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद, तर शेलारांकडे शहराध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यानंतर आव्हाड, शेलार, पिंगळे या तिघांनी तालुकानिहाय पक्षाच्या बैठका घेत, संघटनेला बळ दिले. मंगळवारी (दि.२९) मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष आव्हाड आणि शहराध्यक्ष शेलार यांनी जिल्ह्यासाठी नव्या टीमची घोषणा केली. बारा तालुकाध्यक्षांच्या नावांची घोषणा करत, त्यांना नियुक्तिपत्रे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या हस्ते देण्यात आली आहेत.
असे आहेत तालुकाध्यक्ष –
नाशिक- रामकृष्ण नामदेव झाडे, येवला- विठ्ठल कारभारी शेलार, दिंडोरी- भास्कर मुरलीधर भगरे, मनमाड- सुधीर विश्वासराव पाटील, मालेगाव- संदीप अशोक पवार, नांदगाव- महेंद्र साहेबराव बोरसे, कळवण- संतोष मुरलीधर देशमुख, देवळा- पंडित सखाराम निकम, चांदवड- प्रदीप नारायण गायकवाड, चांदवड शहर- प्रकाश वसंतराव शेळके, सिन्नर- अॅड. संजय कचरू सोनवणे, निफाड- दिलीप तुकाराम मोरे.
नाशिक शहर कार्यकारिणी
सरचिटणीस- मुन्ना अन्सारी, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष- धनंजय रहाणे, पूर्व विभाग अध्यक्ष- फरीद शेख, नाशिकरोड विभाग अध्यक्ष- अशोक पाटील मोगल, सिडको विभाग अध्यक्ष- विजय मटाले, सातपूर विभाग अध्यक्ष- प्रवीण नागरे, पंचवटी विभाग कार्याध्यक्ष- संतोष जगताप, सिडको विभाग कार्याध्यक्ष- कृष्णा काळे.
हेही वाचा :