धुळे : साक्रीतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आ. गावितांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट | पुढारी

धुळे : साक्रीतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आ. गावितांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा शासकिय निवासस्थानी भेट घेऊन धुळे जिल्ह्यातील विविध आदिवासी प्रलंबीत प्रश्न व विकास कामांबाबत व संघटनात्मक विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी धुळे जिल्हा निरीक्षक तथा संपर्क प्रमुख प्रसाद ढोमसे, आमदार मंजुळा गावीत, शिवसेना माजी तालुकाप्रमूख विशाल देसले उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते धुळे जिल्हातील प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. त्यानुसार आजी माजी पदाधिकारी यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यासह गावागावात राज्य शासनाच्या विवध योजना तळागाळातील सर्व नागरीकांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा त्यासाठी सर्व पदाधिकार्यांनी प्रयत्न करावा अश्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

ऑगस्ट महिना संपत आला तरी तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नाही व दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर शेतकऱ्यांना शासनाकडून सरसकट पिकविमा मंजुर करून मदत मिळावी असे आ. मंजुळा गावित यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. यावेळी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर जिल्हयातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे साक्री तालुक्याला आ. गावीत व जिल्हा निरीक्षक प्रसाद धोमसे यांनी सांगितले. यावेळी साक्री तालुक्याचे माजी तालुकाप्रमुख विशाल देसले, राजशे पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button