संगमनेर : दूधगंगा अपहारातील 21 जणांवर एमपीआयडी कलम | पुढारी

संगमनेर : दूधगंगा अपहारातील 21 जणांवर एमपीआयडी कलम

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी 21 जणांवर शहर पोलीसात एमपीआयडी अर्थात महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापना मधील )हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबतचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. तसेच पोलीस कोठडीची मुदत संपलेल्या व्यवस्थापक व लेखापरीक्षकासह पाचही जणांना न्यायाधीश मनाठकर यांनी 4 दिवसाची पोलीस कोठडी पुन्हा सुनावली.

संगमनेर येथील दूधगंगा नागरी पत संस्थेत 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयाचा अपहार झाला आहे. या प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी जि प. सदस्य भाऊसाहेब कुटे, यांच्यासह पत्नी विमल, शकुंतला, मुलगा दादासाहेब, संदीप, अमोल आणि सून सोनाली पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, अकाउंटंट स्व . भाऊसाहेब गायकवाड, तात्कालीन लेखापरीक्षक अमोल क्षीररसागर, कर्जदार चेतन कपाटे, कृष्णराव कदम ,त्याची पत्नी प्रमिलाताई कदम, मुलगा अजित कदम, सुजित कदम, संदीप जरे, अरुण बुरुड, लहानु कुटे, उल्हास थोरात, सोमनाथ सातपुते, उत्तम लांडगे यांच्यासह 21 जणांवर शहर पोलिसात अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतसंस्थेचा व्यव थापक आणि तात्कालीन लेखापरीक्षक याच्यासह तीन कर्मचारी अशा 5 जणांना अटक केली आहे. मात्र पतसंस्थेचा चेअरमनसह त्याचे सर्व नातेवाईक फरार आहे.

पोलिसात ज्या ठेवीदा रांच्या ठेवी दूधगंगा पतसंस्थेत आहेत. त्या ठेवीदारांनी आपल्या ठेवीचा पुरावा म्हणून पावत्या आणि दिलेला फॉर्म भरून पोलिसांकडे दाखल करावा असे आवाहन पो. नि. भगवान मथुरे यांनी केले होते, ठेवीदारांनी आपल्या ठेवीच्या सर्व पावत्या आणि अर्ज भरून शहर पोलिसांकडे जमा केले आहेत. त्या ठेवींचा विचार करत अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेल्या सर्व 21 जणांवरती एमपीआयडी हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. त्यामुळे आता ठेवीदारांच्या ठेवींना खर्‍या अर्थाने संरक्षण मिळणार आहे.

सध्या अटकेत असलेला पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ लेखापरिक्षक अमोल क्षीरसागर याच्यासह लहानु कुटे, उल्हास थोरात आणि सोमनाथ सातपुते या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्या सर्वांची गुरुवारी पोलीस कोठडीची मदत संपली होती. त्यांना न्यायालयात न्यायाधीश मनाठकर यांच्यासमोर हजर केले असता दि. 28 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले आहे

हेही वाचा

प्रदूषणाचा आरोग्यावर परिणाम कसा होतो?

राज्यात 108 रुग्णवाहिका सेवा होणार ठप्प?

पोलंडमधील प्राचीन दफनभूमीत सापडले चांदीचे दागिने

Back to top button