मालगाडीवर चढताच बसला धक्का, जळगाव रेल्वे स्थानकावर माथेफिरुचा विजेचा शॉक लागून मृत्यू | पुढारी

मालगाडीवर चढताच बसला धक्का, जळगाव रेल्वे स्थानकावर माथेफिरुचा विजेचा शॉक लागून मृत्यू

जळगाव : येथील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीवर चढत असताना विजेच्या धक्क्याने एका माथेफिरुचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, याबाबत रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर पेट्रोल वाहतूक करणारे टँकर उभे होते. यावेळेस एक अंदाजे ५० वर्षीय व्यक्ती याठिकाणी येऊन त्याने टँकरवर चढण्याचा प्रयत्न केला. टँकरवर चढताच वीज तारांना स्पर्श झाल्याने त्याला जोराचा झटका बसल्याने तो लागलीच खाली फेकला गेला. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) घडली आहे. याबाबत आता रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मयताची ओळख पटविण्याचे आवाहन ….

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस ठाण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतिफ शहा यांनी सदर व्यक्तीला तपासणी करून यांची मयत घोषित केले. रेल्वे पोलीस कर्मचार्‍यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस कर्मचारी पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन कुमार भावसार हे करीत आहे.

हेही वाचा : 

Back to top button