पवार कुटुंबीय धमकी देण्याचे प्रकार करत नाहीत : छगन भुजबळ | पुढारी

पवार कुटुंबीय धमकी देण्याचे प्रकार करत नाहीत : छगन भुजबळ

पुणे। पुढारी वृत्तसेवा

अशा प्रकारे धमकी देण्याचे प्रकार पवार कुटुंबीय कधीही करीत नाहीत. शरद पवार तर अजिबातच करीत नाहीत ते वैचारिक लढाई करीत असतात. हा प्रकार उत्साहाच्या भरात काही कार्यकत्यांनी केला असावा त्यातूनच ही घटना घडली. पोलीस आता त्यांचे काम करीत आहेत अशी माहिती राज्याचे नवनिर्वाचित मंत्री छगन भूजबळ यांनी दिली.

भूजबळ हे सोमवारी शहरात महात्मा फुले वाड्यात आले असता मुक्कामी थांबले होते. मंगळवारी सकाळी त्यांना आलेल्या धमकीच्या फोन बाबत पत्रकारांनी तुम्हाला आलेल्या धमकीत पवार कुटुंबियांचा हात आहे का..असा प्रश्न केला. यावर त्यांनी थेट पवार कुटुंबियांची बाजू घेत त्यांच्या कडून असे होऊच शकत नाही असे सांगितले की, आमच्या शपथविधी नंतर उत्साही कार्यकर्त्यांकडून असे प्रकार घडत असतात आम्ही अशा प्रकारांकडे लक्षही देत नाही.

संबंधित बातम्या

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, शपथविधी झाला असला तरीही खाते वाटपा बाबत मुख्यमंत्र्या सोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठका झाल्या आहेत. लवकरच खातेवाटप होऊन नवनिर्वाचित मंत्र्याना पदभार सोपवला जाईल.

हेही वाचा :

Back to top button