सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा | येथील भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील परीरक्षण भूमापक महिला कर्मचाऱ्यास ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सोमवारी (दि.१०) दुपारी दीडच्या सुमारास भूमिअभिलेख कार्यालयातच हा सापळा यशस्वी झाला. प्रतिभा दत्तात्रय करंजे (४२) असे महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Nashik Sinner)
तालुक्यातील मनेगाव येथील तक्रारदाराने सिटी सर्व्हे नंबर १९७, १९८ व १९९ असे तीन प्लॉट पत्नीच्या नावाने खरेदी केले होते. त्यावरील जुने मालकाचे नाव कमी करून तक्रारदार यांच्या पत्नीचे नवीन नाव लावण्यासाठी सिन्नरच्या भूमिअभिलेख कार्यालयात ५ जुलै रोजी अर्ज सादर केला होता. नवीन नावाची नोंदणी व जुने नाव कमी करण्यासाठी परीरक्षण भूमापक प्रतिभा करंजे यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी करून ती कार्यालयात स्विकारली. (Nashik Sinner)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या पथकाने सदर कारवाई केली. या पथकात उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली हवालदार प्रकाश डोंगरे, संतोष गांगुर्डे, प्रणय इंगळे, महिला पोलीस शिपाई शीतल सूर्यवंशी सहभागी झाले होते. संशयित प्रतिभा करंजे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Nashik Sinner)
हेही वाचा :