नाशिक : पंचवटीत अवैध धंद्यावर पोलिसांची कारवाई, हातभट्टीतील मद्यसाठा जप्त | पुढारी

नाशिक : पंचवटीत अवैध धंद्यावर पोलिसांची कारवाई, हातभट्टीतील मद्यसाठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पंचवटी पोलिसांनी रविवारी (दि. २) कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अवैध मद्यविक्री करणाऱ्यांसह जुगाऱ्यांची धरपकड करीत त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. वाल्मीक नगर, वाघाडी, संजय नगर, हिरावाडी या भागातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली आहे.

रविवारी दुपारी बाराच्या सुमारास पोलिसांनी संशयित शिवाजी सिताराम गायकवाड (रा. वाल्मिक नगर) याच्या ताब्यातून १ हजार ८४५ रुपयांचा देशी मद्यसाठा जप्त केला आहे. तर दुपारी दोनच्या सुमारास संशयित गोकुळ अंबादास उगलमुगले याच्या ताब्यातून हातभट्टीतील ४० लिटर मद्यसाठा जप्त केला आहे. तर संशयित विकास विलास कळवणे (रा. जोशी कॉलनी, हिरावाडी) याच्या ताब्यातून ९५५ रुपयांचा देशी मद्यसाठा जप्त केला आहे. हे तीनही संशयित बेकायदा परवाना नसताना अवैद्य दारू विक्री करताना मिळून आल्याने त्यांच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे दुपारी अडीचच्या सुमारास वाघाडी परिसरातून संशयित प्रवीण बाळू बागरे (रा. वाल्मीक नगर) यास ताब्यात घेत त्याच्याकडून १५ हजार ९०० रुपयांची रोकड, जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button