Nashik : सहकार परिषद विकासाचे मॉडेल म्हणून परिचित होईल : ना. डॉ. भारती पवार | पुढारी

Nashik : सहकार परिषद विकासाचे मॉडेल म्हणून परिचित होईल : ना. डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आधुनिक युगात सहकार तळागाळात नेण्यासाठी प्रबोधनात्मक जाणीव गतिमान करण्यासाठी शहरात होणाऱ्या राज्यस्तरीय सहकार परिषद आर्थिक विकासाचे मॉडेल म्हणून परिचित होईल. या परिषदेच्या माध्यमातून सहकार बँकिंग क्षेत्रातील आधुनिक बदल, डीजिटायझेशन, तंत्रज्ञान, भविष्यातील आव्हाने या चर्चांबरोबर सहकारातील भविष्याचे लक्ष काय यावर विचारमंथन होईल. भारताच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणाऱ्या सहकार परिषद यशस्वी करण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनतर्फे डिसेंबर २०२३ मध्ये होणार्‍या महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बॅंक्स परिषद लोगो अनावरण प्रसंगी त्या ठाकरे इंजिनिअरींग महाविद्यालय, गंगापूर रोड येथे बोलत होत्या. पवार म्हणाल्या, सहकार क्षेत्रातील अनेक प्रश्नांची, अडचणींची सोडवणूक करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञांच्या सहभागाने परिषदेच्या माध्यमातून निश्चित दिशा मिळू शकेल. जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, या परिषदेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाकडे नागरी सहकारी बँकांच्या संबंधी असलेले प्रश्न, समस्या व अडचणींचे निराकरण व्हावे. नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन घेत असलेली ही महाराष्ट्रातील दुसरी सर्वात मोठी नागरी सहकारी बँकांची परिषद आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा डॉ. शशि अहिरे, महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक फेडरेशन अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, जिल्हा उपनिबंधक फैय्याज मुलानी, राजेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते. वसंतराव खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. नानासाहेब सोनवणे यांनी आभार मानले.

हेही वाचा : 

Back to top button