नाशिक : कसारा घाटात भीषण अपघात, दोन जैन साध्वी महिलांचा मृत्यू | पुढारी

नाशिक : कसारा घाटात भीषण अपघात, दोन जैन साध्वी महिलांचा मृत्यू

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटातील हॉटेल आँरेज समोर गुरुवारी (दि. 8) पहाटे ५ वाजेच्या सुमारास कंटेनरच्या धडकेत दोन जैन महिला साध्वींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

कसारा घाटातून नाशिक येथील पवननगर स्थानकात चातुर्मास कार्यक्रमासाठी परम पूज्य श्री. सिद्धाकाजी म सा व परमपूज्य श्री. हर्षाईकाजी महाराज या पहाटेच्या सुमारास पायी प्रवास करत असताना ही भीषण दुर्घटना घडली. एका कंटेनरने पिकअपला आणि ओमनी कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पायी चालणाऱ्या दोघाही महिला साध्वींना धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा :

Back to top button