पिंपळनेरच्या स्टेट बँकेची केली फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल | पुढारी

पिंपळनेरच्या स्टेट बँकेची केली फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
शेतजमिनीवर बोजा असल्याचे माहित असताना शेतजमिनीची परस्पर विक्री करून भारतीय स्टेट बँक, शाखा पिंपळनेरची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तसेच सदर शेतजमिनी विकत घेणाऱ्या अशा तिघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय स्टेट बँक शाखा पिंपळनेरचे शाखाधिकारी मनोज देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मिलाबाई आत्माराम कोकणी-चौधरी (रा.निरगुडीपाडा,ह.मु. भोयेनगर,पिंपळनेर) यांच्या मालकीच्या शेतजमिनीवर भारतीय स्टेट बँक शाखा, पिंपळनेर कडील चार लाखाचा बोजा होता. बोजा असल्याची माहिती असतांना देखील तो बुडविण्याच्या हेतून संजय पांडू चौरे (रा.शिवपाडा पो. शिरसोले,ता.साक्री) याच्या मदतीने शेतजमिनीच्या दस्तऐवजात फेरफार करण्यात आली. तसेच सदर शेतजमिन ही हेमंत लोटन राऊत (रा. जामखेल,ता.साक्री) याच्या नावावर करण्यात आली. दरम्यान, बँकेच्या बोजा संबंधी वरील तिघांना नोटीस बजावून देखील त्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशाने वरील तिघा संशयितांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे हे पुढिल तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button