Nashik : नांदगाव येथे लोखंडी हातोडीने वार करत युवकाची हत्या | पुढारी

Nashik : नांदगाव येथे लोखंडी हातोडीने वार करत युवकाची हत्या

नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
नांदगाव: येथील आनंद नगरमध्ये राहणाऱ्या वाल्मीक साहेबराव ठाकूर (पवार) (३५) या युवकाची मंगळवारी (दि. १६) रात्री हातोडीने वार करत हत्या करण्याची घटना घडली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका संशयितास अटक केली आहे.

मृत वाल्मीकच्या आनंद नगर येथील राहत्या घरी त्याच्या पायांवर आणि डोक्यात हातोडीने वार करत गंभीर जखमी करत हत्या करण्यात आली. संशयीत आरोपीच्या सासू-सासऱ्यांना म्हणजेच मृत वाल्मीकच्या आई-वडीलांना वाल्मीक नेहमीच दारु पिऊन मारहाण करत असल्याने ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button