नाशिक : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

जन्मठेप
जन्मठेप

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा 

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण करून पत्नीचा खून करणाऱ्या निर्दयी संशयित आरोपी पतीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे फिर्यादी असलेल्या मुलाने आपली साक्ष फिरवल्यानंतर देखील इतर साक्षीदारांच्या साक्ष आणि पुराव्याच्या आधारे ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रामा मोहन कुवर (रा. प्रतापगड, ता. सुरगाणा, जि. नाशिक) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावली असलेल्या पतीचे नाव आहे.

या गुन्ह्याचा तपास करणारे सुरगाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांनी पुरावे जमा करून संशयित आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी वकील कोतवाल यांनी काम पाहिले. न्यायालयाने वेगवेगळे साक्षीदार तपासून वैद्यकीय व इतर पुराव्यांच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपी रामा कुवर याला जन्मठेपेची व पंचवीस हजार रुपये दंड, व दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद सुनावली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news