Nashik Crime : जुन्या वादातून तरुणावर तलवार, कोयत्याने हल्ला (CCTV) | पुढारी

Nashik Crime : जुन्या वादातून तरुणावर तलवार, कोयत्याने हल्ला (CCTV)

नाशिक रोड : पुढारी वृत्तसेवा
जुन्या वादातून देवळाली गावात तरुणावर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवत तरुणाला गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून याप्रकराने देवळाली गावात दहशत निर्माण झाली आहे.

मागील काही दिवसांपासून नाशिकरोड व परिसरात तलवारी, कोयतेदारी टोळीची दहशत तयार झाली आहे. यामुळे सामान्य जनता भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. मंगळवारी (दि. २)  रात्रीच्या वेळी देवळाली गाव परिसरात तरुणावर हल्ला झाला. तीन ते चार जणांच्या एका टोळक्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून एकावर  कोयते, तलवारीच्या साहाय्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव शिबान शेख बबलू असे आहे. हा हल्ला हा देवळाली गाव परिसरात असलेल्या श्री मसोबा मंदिराच्या मागे घडला शेख हा रात्रीच्या वेळी घरी जात असताना तीन ते चार जणांच्या टोळक्याने हातात कोयते व तलवारी घेऊन दहशत निर्माण केली व शिबान शेख याच्यावर जुन्या वादाची कुरापत काढून त्याच्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. दरम्यान या हल्ल्यानंतर टोळके हे पसार झाले. जखमी झालेल्या शिबान शेख यास आजूबाजूच्या नागरिकांनी व मित्रांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. ही घटना उपनगर पोलिसांना समजतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.  घटनेप्रकरणी उपनगर पोलिसांनी 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनगर पोलीस करत आहे. या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलीस खाल्लेखोरांचा तपास घेत आहे.

हेही वाचा : 

Back to top button