नाशिक : शेतकर्‍यांना 500 रुपये अनुदान देण्याची आ. भुजबळांची मागणी | पुढारी

नाशिक : शेतकर्‍यांना 500 रुपये अनुदान देण्याची आ. भुजबळांची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असताना शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. सभागृहात वारंवार मागणी करूनदेखील सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असून, राज्याच्या कृषिमंत्र्यांकडून संवेदनाहीन वक्तव्य केली जात आहेत. याचा निषेध व्यक्त करत कांदा उत्पादक शेतकर्‍यांना किमान 500 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. शेतकर्‍यांना मदत न मिळाल्याने भुजबळांनी सभागृहातून वॉकआउट केले.

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात नियम 57 अन्वये प्रस्ताव मांडला. तो चर्चिला गेला नसल्याने त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. शेतकरी अडचणीत असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. त्यावर राज्याच्या कृषिमंत्र्यांनी केलेली टिप्पणी संवेदनाहीन आहे. ते म्हणाले, कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांदा पिकासाठी 1200 रुपये खर्च येत आहे. मात्र, कांद्याला आज 500 रुपये, तर जास्तीत जास्त 700 रुपये भाव मिळतो ही सध्याची स्थिती आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांना शासनाने केवळ 300 रुपये मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी असल्याने किमान 500 रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा:

Back to top button