Nashik : कसब्याच्या विजयानंतर नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा जल्लोष | पुढारी

Nashik : कसब्याच्या विजयानंतर नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा जल्लोष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या २८ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला, अशी ओळख असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी तब्बल ११ हजार मतांनी दणदणीत विजय मिळविला. शहर काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीच्या वतीने धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

नाशिक शहर काँग्रेस भवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल, फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून विजय साजरा केला. हा जनतेचा विजय असून, महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय आहे. कसब्यातील जनतेने महागाई, बेरोजगारी आणि बेकायदेशीर सरकारच्या विरोधात मतदान केले. त्याबद्दल सर्व मतदारांचे अभिनंदन, अशा भावना शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांनी व्यक्त केल्या. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांतील नेत्यांनी ॲड. छाजेड यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख सुनील बागूल, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार वसंत गिते, दत्ता गायकवाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश सरचिटणीस नाना महाले, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, विलास शिंदे, वत्सला खैरे, महेंद्र बडवे, सचिन मराठे, निवृत्ती अरिंगळे, हनीफ बशीर, गुलजार कोकणी, आशा तडवी आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button