नाशिक : रक्ताच्या सहाय्याने पत्र लिहून मुख्यमंत्र्याना कांदा अग्निडाग समारंभाचे निमंत्रण | पुढारी

नाशिक : रक्ताच्या सहाय्याने पत्र लिहून मुख्यमंत्र्याना कांदा अग्निडाग समारंभाचे निमंत्रण

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील नगरसुल येथील कृष्णा भगवान डोंगरे या युवा शेतकऱ्यांचे ६ मार्च २०२३ रोजी शेतातील उभ्या कांदा पिकाला अग्निडाग समारंभाचे आयोजन केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतः च्या रक्ताने पत्र लिहून आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.
स्वत:च्या रक्ताने तयार केलेल्या पत्रात त्यांनी आपली व्यथा व्यक्त केली आहे. वाघासारखा जगनाथा शेतकऱ्याला स्वार्थी राजकारणामुळे प्राण्यासारखे मरण पत्करावे लागत आहे. शेतकऱ्यापुढे वीज, हमीभाव, सिंचन आरोग्य, शिक्षण, मुले-मुलींचे विवाह असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात शेतकऱ्याला कांदा रडवतो आहे. राजकारणी मात्र सत्ता संघर्षात धुंद आहेत. कांदा उत्पादकांचा कांदयाचा उत्पन्न खर्चही निघत नसून एकरी ५० हजार रू. तोटा सहन करावा लागत आहे. शेतकरी विरोधी सत्ताधारक भाजप सरकार यांचे मात्र सुलतानी कारभार सुरु आहेत.  शेतकरीपुत्र असूनही आवाज उठवला जात नाही. शेतकऱ्यांसाठी कोणताही दौरा किंवा विशेष पुढाकार घेतला जात नाही. त्यामुळे रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री यांच्याकडे विनंती करण्यात येत आहे की, “आपण काही करू शकत नसाल तर किमान मी ठेवलेल्या कांदा अग्नीडाग कार्यक्रमास आवर्जून हजर रहावे” असे आग्रहाचे निमंत्रण दिले. कृष्णा भगवान डोंगरे यांनी मागील वर्षी शेतात उभ्या कांद्याला पेटवून दिले होते. अनेक विरोधीपक्षनेते भेटी देऊन गेले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अर्धेनग्न अवस्थेत आंदोलनही केले. डोंगरे यांनी ह्या अग्नीडाग समारंभाच्या पत्रीका छापून त्या वितरीत केल्या आहेत.
रक्ताने लिहिलेल्या पत्रिकेतील मजकूर असा..
समारंभाची तारीख 6 मार्च 2023 होळीच्या मुहूर्तावर करण्याचे योजले असून
उपस्थिती प्रार्थनीय पत्रिकेत आशीर्वाद
भाजप समारंभाचे प्रमुख अतिथी – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
राज्याचे उपमुख्यमंत्री – देवेंद्रजी फडणवीस
त्याचप्रमाणे माननीय सौ. भारतीताई पवार, केंद्र आरोग्य कल्याण मंत्रालय.
प्रेक्षक-महाराष्ट्रातील सर्व मीडिया
संयोजक-महाराष्ट्रातील सर्व शेतकरी
व्यवस्थापक – महाराष्ट्रातील सर्व शेतकरी मित्र परिवार
निमंत्रक-कृष्णा भगवान डोंगरे
सौ. ज्योती कृष्णा डोंगरे
असून समारंभ ठिकाण मातुलठाण नगरसुल, मातुलठाण. असे आहे.

हेही वाचा:

Back to top button