नाशिक : मद्यसाठ्यासह साडेनऊ लाखांचा ऐवज जप्त | पुढारी

नाशिक : मद्यसाठ्यासह साडेनऊ लाखांचा ऐवज जप्त

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा 

राज्य उत्पादन शुल्क, कळवण विभाग यांना मिळालेल्या खबरीनुसार नाशिक – कळवण रस्त्यावर पिंपळणारे शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुजरातमधून दादरा-नगर-हवेली दमण राज्यातील विक्रीचा मद्यसाठा वाहतूक करताना पिकअप जप्त करीत सुमारे साडेनऊ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

कळवण विभाग व दिंडोरी भरारी पथकाने सोमवारी (दि. १३) संयुक्तरीत्या येथे सापळा रचून वाहन तपासणी करताना एक सफेद रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो चारचाकी मालवाहतूक पिकअप वाहन (क्र. जीजे ०६, एक्सएक्स ५६६२) मध्ये अंतर्गत बदल करून चोरकप्पा करून मद्याची अवैध वाहतूक करताना वाहनासह परराज्यातील विदेशी मद्यसाठा जप्त केला. वाहनासोबत सुरेशकुमार रामलाल बिश्नोई याला अटक केली आहे.

निरीक्षक एस. के. सहस्रबुद्धे, दुय्यम निरीक्षक एम. बी. सोनार, एस. व्ही. देशमुख, जवान दीपक आव्हाड, विलास कुवर, एम. सी. सातपुते, पी. एम. वाईकर, व्ही. आर. सानप, गणेश शेवगे, सचिन पोरजे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

हेही वाचा : 

Back to top button