जळगावात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार | पुढारी

जळगावात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत चोपडा शहर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गुन्ह्यांतील संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमुळे चोपडा तालुका हदरला आहे. पहिल्या घटनेत चोपडा तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय तरुणी ही एमएससीआयटीचे शिक्षण घेण्यासाठी शहरातील एका खासगी क्लासला जात होती. मे-२०२२ मध्ये गावातील विलास सुभाष भिल याने मुलीच्या लहान भावाला मारून टाकेल, अशी धमकी देत त्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून चोपडा ते गोरगावले रस्त्यावरील शेतात जबरीने नेत अत्याचार केला. तसेच पीडित मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केली. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी विलास सुभाष भिल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या घटनेत चोपडा तालुक्यातीलच एका गावातील १८ वर्षीय तरुणीचे समीर सलीम पिंजारी (रा. जळगाव) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दि. ६ जानेवारी २०२२ रोजी तरुणी अल्पवयीन असताना सकाळी ११ ते दुपारी १ च्या सुमारास चोपडा ते वीरवाडे रस्त्यावरील शेतात नेऊन तिच्यावर पिंजारीने दोन वेळेस अत्याचार केला. तसेच दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास तिसऱ्यांदा अत्याचार करण्याच्या प्रयत्नात पीडितेने नकार दिला असता त्याचा राग येऊन संबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडीतेने चोपडा शहर गाठत पोलिसात तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी समीर सलीम पिंजारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अजित सावळे हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button