धुळे : पुढारी वृत्तसेवा
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अद्याप कोणताही अधिकृत उमेदवार दिलेला नसला तरी येत्या दोन दिवसांमध्ये या मतदार संघात आपली भूमिका पक्ष स्पष्ट करेल, असे सुतोवाच आज राज्याचे मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात केले आहे.
धुळे येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावल्या नंतर त्यांनी पत्रकारांची बरोबर संवाद साधला. यावेळेस त्यांनी पदवीधर मतदारसंघ संदर्भात आपली भूमिका मांडली. या निवडणुकीसाठी अजूनही भारतीय जनता पार्टीची वेट अँड वॉचची भूमिका असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. तसेच या संदर्भातील निर्णयाला कालावधी लागणार आहे. पक्षाने या मतदारसंघासाठी कुठेही अधिकृतपणे उमेदवार दिलेला नाही .तसेच यापूर्वी देखील कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसल्यामुळे तसेच वरिष्ठ पातळीवरून अद्याप भूमिका स्पष्ट झालेली नसल्यामुळे कार्यकर्ते त्यांना वाटेल त्या उमेदवारासोबत प्रचारासाठी फिरत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :