नाशिक : चंद्रेश्वरबाबा पालखी सोहळ्यास भक्तांचा जनसागर

चांदवड : श्रीक्षेत्र चंद्रेश्वर महादेव मंदिराचे प्रथम चंद्रेश्वरबाबा स्व. स्वामी दयानंदजी व द्वितीय चंद्रेश्वरबाबा महामंडलेश्वर विद्यानंदपुरीजी महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त आयोजित पालखी सोहळ्यात सहभागी झालेले सर्व महंत, पुजारी व भाविक भक्त. (छाया : सुनील थोरे)
चांदवड : श्रीक्षेत्र चंद्रेश्वर महादेव मंदिराचे प्रथम चंद्रेश्वरबाबा स्व. स्वामी दयानंदजी व द्वितीय चंद्रेश्वरबाबा महामंडलेश्वर विद्यानंदपुरीजी महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त आयोजित पालखी सोहळ्यात सहभागी झालेले सर्व महंत, पुजारी व भाविक भक्त. (छाया : सुनील थोरे)
Published on
Updated on

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

येथील श्रीक्षेत्र चंद्रेश्वर महादेव मंदिराचे प्रथम चंद्रेश्वरबाबा स्व. स्वामी दयानंदजी व द्वितीय चंद्रेश्वरबाबा महामंडलेश्वर विद्यानंदपुरीजी महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि.९) आयोजित उत्सवाला भक्तपरिवाराचा अलोट जनसागर उसळला होता.

श्री चंद्रेश्वरबाबा पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला रात्री ह.भ.प. नारायण महाराज पंढरपूरकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. सोमवारी सकाळी चंद्रेश्वर महादेव अभिषेक व चंद्रेश्वरबाबा समाधी पूजन, सप्तऋषी समाधी पूजन होऊन पालखी सोहळ्यात असंख्य भाविक भक्तांसह पेठच्या नाथशक्ती ग्रुपचे भक्त व श्री चंद्रेश्वर भक्त परिवाराचे सदस्य मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. पालखी सोहळ्यानंतर भंडारा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी महंत बन्सीपुरीजी महाराज (तृतीय चंद्रेश्वरबाबा), महंत लक्ष्मीनारायणपुरीजी, महंत जगन्नाथपुरीजी, दिगंबर स्वामी शिवानंदपुरीजी, स्वामी महेशपुरीजी (काशी), स्वामी जयदेवपुरीजी (चंद्रेश्वरगडाचे व्यवस्थापक) स्वामी अजयपुरीजी (त्र्यंबकेश्वर आखाडा), स्वामी डॉ. नागराजपुरीजी (नाशिक), स्वामी गणेशपुरीजी (देवदारे), स्वामी रामचंद्रपुरीजी (नागापूर) आदी संत-महंत व पंचक्रोशीतील भजनी मंडळ व चंद्रेश्वर भक्त परिवारातील असंख्य भाविक – भक्त सोहळ्यात सहभागी झाले होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news