Jasprit Bumrah : बुमराह अनफिट, श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर; भारतीय संघात गोंधळ

Jasprit Bumrah : बुमराह अनफिट, श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर; भारतीय संघात गोंधळ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. टीमचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) फिटनेसच्या कारणास्तव श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर पडला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच त्याला वनडे संघात स्थान मिळाले होते. पण बीसीसीआयला त्याच्यासोबत अजून धोका पत्करायचा नसल्याने त्याला मालिकेतून वगळण्यात आल्याचे समजते आहे. या निर्णयानंतर भारतीय क्रिकेट संघात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे की काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

काही दिवसांपूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियात बुमराहला (jasprit bumrah) 'स्पेशल' एंट्री मिळाली होती. मात्र, मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या सामन्यापूर्वीच तो टीम इंडियाचा भाग नसेल अशी अपडेट समोर आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त आपल्या ट्विटर अकौंटवरून प्रसिद्ध केले आहे. रिपोर्टनुसार, बीसीसीआय बुमराहला इतक्या लवकर ॲक़्शनमध्ये आणणार नसून फिटनेसच्या आधारावर त्याला मालिकेतून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे. दरम्यान, बीसीसीआयने अद्याप या प्रकरणी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

29 वर्षीय बुमराह (jasprit bumrah) सप्टेंबरच्या अखेरीपासून संघाबाहेर आहे. स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे तो 2022 च्या आशिया कपमधून बाहेर पडला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील वनडे मालिकेत बुमराहचे पुनरागमन झाले होते. मात्र, तो पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला होता, त्यानंतर तो टी-20 विश्वचषक स्पर्धेतूनही बाहेर पडला होता. या स्पर्धांमध्ये भारतीय संघाला बुमराहची उणीव भासली. 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी त्याची टीम इंडियात निवड झाली होती. पण पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, तो आता या मालिकेतूनही बाहेर पडला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करू शकतो (jasprit bumrah)

निवड समितीच्या शिफारशीनुसार बुमराहचा संघात समावेश करण्यात आल्याचे बोर्डाने म्हटले होते, मात्र, आता बीसीसीआयने एनसीएच्या शिफारसीनुसार त्याला वनडे मालिकेत न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात होणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका आणि ऑक्टोबरमध्ये होणारा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुमराह 18 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळू शकतो.

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल , कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग.

भारत विरुद्ध श्रीलंका वन डे मालिकेचे वेळापत्रक :

पहिली वनडे : 10 जानेवारी, गुवाहाटी
दुसरी वनडे : 12 जानेवारी, कोलकाता
तिसरी वनडे : 15 जानेवारी, तिरुवनंतपुरम

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news