नाशिक : तब्बल सात वर्षे बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार | पुढारी

नाशिक : तब्बल सात वर्षे बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल सात वर्षे बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी अत्याचार केला केल्याची घटना अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उघडकीस आली आहे. अखेर नराधम बापाचा त्रास असह्य झाल्याने मुलीने मोठ्या हिमतीने बापा विरोधात अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन (सध्याचे वय 22) मुलीच्या बापाने मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला. घरी भाऊ, बहीण, आई नसताना नराधम बापाने २०१६ पासून ते २०२२ पर्यंत तब्बल सात वर्ष अत्याचार केले. तसेच या घटनेची वाच्यता कुठे केली तर आपलीच बदनामी होईल, अशी धमकी दिली. मात्र, बापाचा त्रास असह्य झाल्याने मोठ्या हिमतीने पीडित मुलीने अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी संशयित नराधम बापाला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या विरोधात अत्याचार व बाललैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एस. पी. बीडकर अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button