नाशिकमध्ये चौकांमधील अतिक्रमणे हटविण्याचे आयुक्तांचे आदेश | पुढारी

नाशिकमध्ये चौकांमधील अतिक्रमणे हटविण्याचे आयुक्तांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांच्या अनुषंगाने बुधवारी (दि.2) पाहणी दौरा केला. दौर्‍यात अपघातग्रस्त ठिकाण मिर्ची चौकासह सिद्धिविनायक चौक, नांदूर नाका चौक, तारवाला सिग्नल, जेलरोड, पेठ रोड, त्रिमूर्ती चौक, सिटी सेंटर मॉलजवळील संभाजी चौक, पश्चिम विभागातील एचडीएफसी चौक आदी चौकांची पाहणी करत चौकांमधील अतिक्रमणे हटवून उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

यावेळी शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उपआयुक्त करुणा डहाळे, नगर नियोजन विभागातील कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल उपस्थित होते. दुर्घटना घडलेल्या मिर्ची चौकात मनपामार्फत केलेली कामे आणि आवश्यक उपाययोजना या अनुषंगाने पाहणी केली. चौकात गतिरोधक टाकण्यात आले आहेत. प्लास्टिक पेंट करण्यात आलेला आहे. सायनेजिसदेखील लावण्यात आलेले आहेत. अतिक्रमण काढून झालेल्या ठिकाणी रस्त्याचे ड्रेसिंग करून त्या ठिकाणी दृश्यमानता वाढविण्याच्या दृष्टीने प्लॅनिंग क्लिअर करणे, नगर नियोजन विभागामार्फत रस्त्याचे डिमार्केशन करणे, दुभाजक टाकणे, कॅट आईज सायलेजेस बसविणे. त्याचप्रमाणे राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने सूचना केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या रस्त्यावरदेखील वारंवार अतिक्रमण विभागामार्फत पाहणी करून हॉकर्स, हातगाड्या हटवण्याचे आदेश देण्यात आले. औरंगाबाद रोडवरील सिद्धिविनायक चौक या ठिकाणीही पाहणी केली. रस्त्याचे डिमार्केशन करणे, फॅनिंगचे डिमार्केशन करणे त्याचप्रमाणे अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. नांदूर नाका चौकाची पाहणी केल्यानंतर या ठिकाणचे जंक्शन स्टॅगर्ड जंक्शन प्रकारातील असल्यामुळे त्या ठिकाणी खड्डे बुजविण्याचे आदेश दिले.

पंचवटीतील तारवाला सिग्नलची पाहणी केली. गतिरोधकावर प्लास्टिक पेंट मारणे, कॅटेज लावणे आणि लोकांना दिसतील अशा पद्धतीचे सायलेजेस लावणे, चौकाची दृश्यमानता वाढवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.

त्रिमूर्ती चौकातील अतिक्रमणे हटविणार
सिटी सेंटर मॉलजवळील संभाजी चौक तसेच एचडीएफसी चौकाची पाहणी केली. चौकाचे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन दृश्यमान्यता वाढविण्याबरोबरच स्पीडब—ेकर टाकणे व थर्मोप्लास्टिक पेंट मारणे अशा स्वरूपाची कामे तातडीने करण्याचे आदेशित केले. त्रिमूर्ती चौकातील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम काढण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना नगर नियोजन विभाग आणि आतिक्रमण विभागाला केली.

हेही वाचा :

Back to top button