नाशिक : बंदुकीचा धाक दाखवून पाच लाखांची खंडणी वसूल | पुढारी

नाशिक : बंदुकीचा धाक दाखवून पाच लाखांची खंडणी वसूल

नाशिक : बंदुकीचा धाक दाखवून युवकाकडून तब्बल पाच लाखांची खंडणी वसूल केल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारंग मकरंद पटेल (45, रा. माणिकनगर, गंगापूर रोड) यांचा मुलगा ओजस याला संशयित अथर्व देशमुख (रा. आनंदवली गाव, गंगापूर रोड) याने बंदुकीची गोळी मारण्याचा धाक दाखवून घरातून पैसे व दागिने घेऊन येण्यास भाग पाडले.

संशयित देशमुखने सोन्याचे दागिने व हिर्‍यांची अंगठी असा चार लाख 95 हजारांचा ऐवज लुबाडला. या प्रकरणी सारंग पटेल यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांत संशयित देशमुख विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला

हेही वाचा :

Back to top button