जळगावात शस्त्र तस्करीचा पर्दाफाश, १२ गावठी कट्टे, जिवंत काडतूसे जप्त करुन दोघांना अटक

जळगावात शस्त्र तस्करीचा पर्दाफाश, १२ गावठी कट्टे, जिवंत काडतूसे जप्त करुन दोघांना अटक

जळगाव : चोपडा शहरातील बसस्थानक आवारात दोन जणांकडून २ लाख ७७ हजार रूपये किंमतीचे १२ गावठी पिस्तूल आणि ५ जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

चोपडा शहरातील बसस्थानकावर काही लोक गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी गुन्हे शोध विभागचे स्वतंत्र पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या. त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोमवारी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता सापळा रचून संशयित आरोपी अमीतकुमार धनपत धानिया (३०) आणि शनेशकुमार रामचंदर तक्षक (३२) दोन्ही रा. भागवी ता.चरखी दादरी जि.भिवानी (हरीयाणा) यांना ताब्यात घेतले.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
दोघांकडून २ लाख ६० हजार किमतीचे १२ गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच ५ हजार रुपये किमंतीचे ५ पिवळ्या धातूचे जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. दोघे संशयीत सर्व मुद्देमाल कुणाला तरी विक्री करणार होते. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपींवर हेडकॉन्स्टेबल किरण गाडीलोहार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा संशयित आरोपींकडून १२ गावठी बनावटीचे कट्टे, ५ जिंवत काडतूस व ३ मोबाईल फोन असा एकुण २ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news