पालघर : उमरोळीत एटीएमवर डल्ला; चौदा लाख लुटले | पुढारी

पालघर : उमरोळीत एटीएमवर डल्ला; चौदा लाख लुटले

पालघर; पुढारी वृत्तसेवा :  पालघर मुख्यालयाला लागूनच असलेल्या उमरोळी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर चोरट्यांनी
डल्ला मारून 14 लाख 50 हजार रुपयाची रोकड लुटून पोबारा केल्याची घटना घडली आहे. तर विराथन बुद्रुक येथील एका घरातून 8 लाख 94 हजार रुपये किमतीचे 28 तोळे किमतीचे दागिने आणि 40 हजारांची रोकड लंपास करण्यात चोरट्यांना यश आले आहे.
वारंवार होणार्‍या चोर्‍यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री उमरोळी येथील एटीएम मशीन
असलेल्या केबिनचा प्रथम (शटर) दरवाजा तोडून हे एटीएम मशीन फोडून त्यातील 14 लाख 50 हजार रुपये लुटून नेल्याची घटना घडली आहे.

चोरट्यांनी आपल्या चेहर्‍यावर मास्क बांधले होते. तसेच चोरांनी चारचाकी वाहनाचा वापर केला असल्याची शंका व्यक्त
करण्यात येत आहे. तसेच ते पालघरच्या दिशेकडून आले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसर्‍या घटनेत वसई-विरार
महानगरपालिकेत आरोग्य विभागात असलेले राकेश वसंत म्हात्रे विराथन बुद्रुक येथे कुटुंबासमवेत राहतात. तसेच त्यांच्या दुसर्‍या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यांचे भाऊ आणि ते तिथे राहत असलेल्या वाढीव बांधकामावरून किरकोळ असा वाद निर्माण झाल्याने
ते आपापल्या खोल्या बंद करून कामालाही गेले. मात्र, सायंकाळी घरी आले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून त्यातील सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. लागलीच त्यांनी पोलिसांना ही खबर दिल्यानंतर हे क्षेत्र कोणत्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते
यावरूनही काही वेळ तपास थांबला होता. अवघ्या दोन चार तासांतच ही चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना तपासकामी सहकार्य करण्यात आले असून आजतागायत कोणत्याही प्रकारचा तपास होवू शकला नसल्याचे
बोलले जात आहे.

Back to top button