नाशिक : समाजहितासाठी सभासदांचा ‘परिवर्तन’चा निर्णय : ॲड. भरत ठाकरे

चांदवड : परिवर्तन पॅनलच्या मेळाव्यात बोलताना डॉ. सयाजी गायकवाड. समवेत इतर मान्यवर
चांदवड : परिवर्तन पॅनलच्या मेळाव्यात बोलताना डॉ. सयाजी गायकवाड. समवेत इतर मान्यवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या 12 वर्षांपासून संस्थेत चाललेल्या कारभारास आम्ही सभासद कंटाळलो असल्याचे सांगत, समाजाच्या हितासाठी सभासदांनी ठाकरे-कोकाटे-क्षीरसागर यांच्या माध्यमातून 'परिवर्तन' करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा ॲड. भरत ठाकरे यांनी केली.

चांदवड तालुक्यातील काजी सांगवीत पार पडलेल्या परिवर्तन पॅनलच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत हाेते. व्यासपीठावर ॲड. नितीन ठाकरे, विश्वास मोरे, भागूजी पाटील ठाकरे, बाळासाहेब पिंगळे, डॉ. सयाजी गायकवाड, सुनील पाचोरकर, रामकृष्ण पवार, बबनराव पूरकर, विकास पाचोरकर, भाऊसाहेब पवार, डॉ. शिरीष राजे, चंद्रभान महाले, शशिकांत जाधव, नंदू बनकर आदी उपस्थित होते. ज्यांना बँक कळत नाही, तेच आरोप करतात. मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष असताना ३५०० कोटी शिल्लक होती. आता अवघे एक हजार कोटी रुपये शिल्लक आहे. मग बँक डबघाईस येताना अध्यक्ष कोण होते? त्यावेळेचे अध्यक्ष पवारांच्या पॅनलमध्ये असल्याचे प्रतिपादन आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. यावेळी अशोक सोनवणे, दौलतराव ठाकरे, नितीन उशीर, दीपक रकिबे, विजय फाफडे, एकनाथ उशीर, शंकरराव आहेर, दीपक पाचोरकर, धनंजय तिडके, बाळूमामा पाचोरकर, बाळासाहेब पाचोरकर, पोपटराव पाचोरकर, गणपत तिडके, विजय निखाडे, तात्याबाबा निखाडे, निवृत्ती शिरसाठ आदी उपस्थित होते. प्रवीण घुमरे यांनी सूत्रसंचालन केले. परिवर्तन पॅनलचे देवळा, उमराणे, वडनेरभैरव, धोडांबे, काजीसांगवी आदी ठिकाणी मेळावे झाले.

बोगस सभासदांना विरोध : ॲड. ठाकरे 

विद्यमान कार्यकारी मंडळासमोर बोलणारे लोक चालत नाही. हात वर करून सभासदांचे हक्क डावलत असतील, तर असे संचालक काय कामाचे? असा सवाल उपस्थित करत नवीन नव्हे, तर बोगस सभासदांना विरोध आहे. सध्या 50 बोगस सभासद असून, त्यांच्यासह इतर जिल्ह्यांतील सभासदांना मात्र विरोध कायम राहील, असे ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news