नाशिक : भावली धरणात वाहून गेलेला युवक मृतावस्थेत सापडला

नाशिक : भावली धरणात वाहून गेलेला युवक मृतावस्थेत सापडला

इगतपुरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
भावली धरणाच्या बॅकवॉटर परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास आंघोळीसाठी गेलेला तरुण सुनील सोनू सांगळे पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला होता. त्या तरुणाचा मृतदेह सोमवारी (दि. 25) सकाळी 11.30 वाजता जवळपास 250 फूट खोल दरीत आढळला.

इगतपुरीजवळ एका बांधकामाच्या साइटवर सुपरवायझर म्हणून सुनील काम करत होता. मित्रांसोबत रविवारी दुपारच्या सुमारास तो आंघोळीसाठी गेला होता. तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख श्याम धुमाळ आणि महिंद्रा कंपनीच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत शोधकार्य चालवले. मात्र यश आले नाही.

सोमवारी सकाळी 6 वाजताच चांदोरी येथील दोन बोट, चार पट्टीचे पोहणारे व आपत्ती व्यवस्थापन टीम यांच्या मदतीने धरण परिसरात शोध मोहिम सुरू केली. अखेर दोनशे फुट खोल दरीत झुडपांमध्ये सुनीलचा मृतदेह आढळून आला. आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य आवजी आगिवले, सोनू वीर व अन्य अन्य दोघांनी मदतकार्य केले. मृतदेह दरीतून बाहेर काढण्यासाठी गुरे चारणार्‍यांनी मदत केली.

सततच्या पावसामुळे नद्या, नाले, बंधारे, धरणे येथे पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. सुरक्षित जागी पर्यटनाचा आनंद घ्यावा. पर्यटकांनी अततायीपणा करुन जीव धोक्यात घालू नये.

-परमेश्वर कासुळे, तहसीलदार

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news