नाशिक : खेळण्यासाठी बाहेर गेला तो परत आलाच नाही, नासर्डीत पोहताना बुडाल्याने मुलाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : खेळण्यासाठी बाहेर गेला तो परत आलाच नाही, नासर्डीत पोहताना बुडाल्याने मुलाचा मृत्यू

नाशिक (सिडको) : तिडके कॉलनीलगतच्या मिलिंदनगर येथील नासर्डी नदीपात्रात पोहणार्‍या 12 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 17) दुपारी घडली. सागर लल्लन चौधरी (रा. मिलिंदनगर, तिडके कॉलनी) असे या मुलाचे नाव आहे.

मिलिंदनगर येथील सात ते आठ मुले मित्तल टॉवरजवळील नासर्डी नदीजवळ दुपारी खेळत होते. नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने काही मुले पाण्यात पोहण्यास उतरली होती. त्यांच्यासोबत सागरही पाण्यात उतरला होता. पाण्यात खेळत असताना सागर पाण्यात बुडून पाण्याच्या प्रवाहात वाहात पुढे गेला. सागरच्या मित्रांनी आरडाओरड करीत मदत मागितली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे रेस्क्यू पथक व मुंबई नाका पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत आहिरे त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मिलिंदनगरजवळील नदीपात्रातून सागरला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

मुंबई नाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत सागर हा इयत्ता आठवीत शिकत होता त्याच्या पश्चात आई वडील एक मुलगा आई-वडील बहिण भाऊ असा परिवार आहे. सागर याचे वडील एका बिगारी चे काम करत असून आई धुणं-भांड्याचे काम करते.

हेही वाचा :

Back to top button