पक्षाशी गद्दारी करणाऱ्या गुलाबराव पाटलांना धडा शिकवणारच : संजय सावंत

पक्षाशी गद्दारी करणाऱ्या गुलाबराव पाटलांना धडा शिकवणारच : संजय सावंत

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांना आजपर्यंत शिवसेनेने मोठं केलं. तेच आता गद्दार निघाले आहेत. मंत्रिपदाच्या लालसेपोटी ते आता बंडखोर झाले आहेत. गद्दार एकनाथ शिंदे यांच्या गळ्याला लागले आहेत. गुलाबराव पाटील यांना शिवसेना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी आज (दि.२८) पत्रकार परिषदेत दिला.

संजय सावंत म्हणाले की, शिवसेना आमदार, खासदारांचा पक्ष नसून, शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर शिवसेनेचे आमदार, खासदार निवडून येतात. शिवसेना एकनिष्ठ आहे. शिवसेनेला शिवसैनिक एकत्र असताना काहीही चिंता करायची गरज नाही. राज्यात इतक्या दिवसांपासून जे चाललंय ते खरं आहे की खोटं? हे शिवसैनिकांना समजत नव्हतं. यामुळे त्यांना आपण कोणाची बाजू घ्यायची हे समजत नव्हतं. मात्र, आता शिवसैनिकांना माहिती आहे. शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे आणि जे पळून गेले ते गद्दार आहेत.

आता संपूर्ण महाराष्ट्रात गद्दारांविरुद्ध शिवसेना पेटून उठणार आहे. शिवसेना पक्ष कोणालाही घाबरत नाही. शिवसेना ईडीला, कोणाच्या धमकीला कशालाच घाबरत नाही. आजपर्यंत इतकं मोठं बंड शिवसेनेत कधीही झालं नव्हतं. मात्र बंडखोरांना इतकी मोठी आमिष कधीच दिली गेली नव्हती. विरोधी पक्षाचं इतकं मोठं बळ याआधी कोणत्याही पक्षाने एखाद्या बंडाला दिलं नसल्यामुळेच शिवसेनेत आज इतकं मोठं बंड झालं, असे सावंत म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news