जळगाव : धावत्या रेल्वेखाली झोकून एकाची आत्महत्या | पुढारी

जळगाव : धावत्या रेल्वेखाली झोकून एकाची आत्महत्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेलेल्या व्यक्तीने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र, आत्महत्याचे कारण समोर आलेले नाही.

योगेश रमाकांत वाणी (४७, रा. रथचौक) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि.४) सकाळी नळ आले असल्याने घरी पाणी भरले. त्यानंतर ते कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडले. असोदा रेल्वेगेटजवळील अपलाईन वरील खांब क्रमांक ४२२/६ ते ८ दरम्यान धावत्या रेल्वेखाली सकाळी १०.१५ झोकून देत आत्महत्या केली. पंचनामाकरीता त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button