मंचर : हिशेबाच्या वादातून तलवारीने वार | पुढारी

मंचर : हिशेबाच्या वादातून तलवारीने वार

मंचर : पुढारी वृत्तसेवा : गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री राम मंदिर सभामंडप कामाचा हिशेब दिला नाही. तसेच पैशांचा वापर पिक्चर बघण्यासाठी केला,

यासाठी चुलत भावाने भावावर तलवारीने वार करून त्याला गंभीर जखमी केले. याबाबत नीलेश एकनाथ गावडे (वय 37, रा. गावडेवाडी, ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये मुस्लीम मावळ्यांकडून शिवरायांना अभिवादन; मशिदीत मुर्तीची प्रतिष्ठापना

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गावडेवाडी गावच्या हद्दीत राणू गावडे मळा येथील कालव्याचे पुलाजवळ अक्षय जयसिंग गावडे याने राम मंदिराच्या सभामंडपाच्या कामाचा हिशेब दिला नाही,

त्या पैशांचा वापर पिक्चर पाहण्यासाठी केला याचा राग मनात धरून नीलेश गावडे याच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात तलवार नीलेश याच्या हातावर, तोंडाला व कानाला लागल्याने दुखापत झाली आहे.

सातारा : फरासवाडीत खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला

त्यावेळी फिर्यादीने तलवार पायाखाली दाबून धरल्याने व त्यांच्याबरोबर असलेल्या संतोष निवृत्ती गावडे यांनी अक्षयला पाठीमागे ढकलले असता अक्षय गावडे ’तुम्ही कोणालाही बोलवा, मी घाबरत नाही, तुझा खून पाडल्याशिवाय राहणार नाही’ असा दम देऊन निघून गेला.

याबाबत मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार डावखर तपास करीत आहेत.

 

Back to top button